टाटा मोटर्सने २०२० वर्षाची सुरुवात केली पूर्णपणे नव्या उत्पादनश्रेणी सह

केली पूर्णपणे नव्या पुणे, : भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेली टाटा मोटर्स २०२० वर्षात अनेक नवीन उत्पादने बाजारात आणण्यास सज्ज आहे. जानेवारी २०२० पासून पूर्णपणे नवीन इडतख उत्पादनांची श्रेणी सर्वांसमोर आणण्यास सुरुवात होईल, असे कंपनीने आज जाहीर केले. याचे प्रात्यक्षिक एका भव्य प्रदर्शनाद्वारे दाखवले जाणार आहे. ग्रेटन नोएडा येथे होणाऱ्या ऑटो एक्स्पो २०२० मध्ये कंपनी ४ नव्या उत्पादनश्रेणी सह जागतिक अनावरणे करणार आहे, तर १४ व्यावसायिक वाहने आणि १२ प्रवासी वाहने प्रदर्शनासाठी ठेवणार आहे.टाटा मोटर्सने २०२० वर्षी राष्ट्राला दिलेल्या योगदानाच्या समृद्ध वारशासह ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. कनेक्टेड भारतासाठी महत्त्वाकांक्षी, नवोन्मेषकारी वाहतूक सोल्युशन्स पुरवून कंपनी शाश्वत भविष्यकाळाची उभारणी करत आहे. हा हेतू टाटामोटर्सच्या पॅव्हिलियनची थीम म्हणून सर्वांसमोर मांडला जाईल.