महाराष्ट्र केसरी

सातारा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे म्हाळुगे - बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ६३ च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची फायनल मोठ्या चुरशीच्या वातावरणात पार पडली. गादी व माती अशा दोन्ही विभागातून अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीतील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके मंगळवारी महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात आमनेसामने होते. या अत्यंत प्रतिष्ठेच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. यावर महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचे अभिनंदन माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी खास आपल्या शैलीत केले आहे. हे असं फक्त महाराष्ट्राच्या भूमीतच पाहायला मिळत. विजयी मल्ल पराभूत मल्लाला खांद्यावर घेऊन आखाड्यात मिरवतो, याच खिलाडूवृत्तीला बड़े दिलवाला म्हणतात! विजयी पैलवान महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान शैलेश शेळके यांचे खूप अभिनंदन. असट्विट उदयनराजे भोसले यांनी केले आहे. __३-२ अशा फरकाने हर्षवर्धन सदगीर याने ही बाजी